विशाल फार्मसी मध्ये इंडक्शन प्रोग्राम मोठया उत्साहात संपन्न
1 min read
आळेफाटा दि.२०:- नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला इंडक्शन प्रोग्राम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आळे (ता.जुन्नर) फार्मसी येथे दि.18/12/024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या इंडक्शन प्रोग्रामसाठी नवप्रवेशित विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने हजर राहिले. या इंडक्शन प्रोग्रामसाठी चंद्रशेखर गाजरे Senior Chemist & Pharmacist Junnar Region, प्रमुख अतिथी म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत मोलाचे मार्गदर्शन केले. चंद्रशेखर गाजरे यांनी विदयार्थ्यांना प्रतिकूल परिस्थिती मध्ये प्रयत्न करणे सोडायचे नाही.
यश नक्की मिळेल सांगत विदयार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे CEO Dr. Gaikwad D.D. तसेच प्राचार्या Dr. Hande R.A. ( IOP) व प्राचार्या Dr. Tajave A.S. सर्व शिक्षक अर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Ms. Kawade A.V. यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
Dr. Hande R. A. यांनी पूर्ण कॉलेजच्या सोयीसुविधा सांगितल्या तसेच Dr. Tajave A.S. यांनी सर्व विषयांची माहीती दिली. Ms. Londhe R.A. यांनी कॉलेज अंतर्गत काम पाहणाऱ्या कमिटीबद्दल माहीती दिली तर Mr. Shaikh S.B. यांनी job opportunitis सांगितल्या.
Mrs. Gurijal A.P. यांनी Exam बद्दल माहीती सांगितली. त्यानंतर शिक्षक व पालक यांच्यात संवाद झाला व त्या दरम्यान त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन Ms. Hulawale A.J. यांनी केले. कार्यक्रम समन्वयक म्हणून Ms. Phalle S.B. व Mrs. Bhujbal T.P. यांनी काम पाहीले.