आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भव्य क्रीडा महोत्सव संपन्न

1 min read

आळेफाटा दि.१९:- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भव्य क्रीडा महोत्सव संपन्न झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य भवारी सर व उपप्राचार्य सुरेश कुऱ्हाडे यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सकाळी कुऱ्हाडे शांताराम रंगनाथ-विश्वस्त ज्ञानराज ग्रामविकास प्रतिष्ठान आळे, कुऱ्हाडे राजेंद्र संभाजी- अध्यक्ष खंडोबा देवस्थान ट्रस्ट आळे व अपेक्षा कुऱ्हाडे – अध्यक्षा युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आळे पिंपळवंडी जि. प. गट, जुन्नर तालुका या मान्यवरांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये कबड्डी, खो-खो यासारख्या सांघिक क्रीडा प्रकाराबरोबर १०० मी. धावणे, गोळाफेक यासारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते.मुलांच्या खो-खो स्पर्धेत बारावी विज्ञान संघ विजयी ठरला तर अकरावी विज्ञान संघ उपविजेता ठरला. मुलींच्या खो-खो च्या स्पर्धेत अकरावी विज्ञान संघ विजयी झाला तर बारावी वाणिज्य संघ उपविजयी ठरला. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत अकरावी कला हा संघ विजयी झाला तर अकरावी विज्ञान संघ उपविजयी झाला. मुलींच्या कबड्डी स्पर्धेत बारावी विज्ञान संघ विजयी झाला तर बारावी वाणिज्य संघ उपविजेता ठरला.वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये मुलांच्या गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक भांगरे हर्षल नितीन, द्वितीय क्रमांक देवगिरे साई संदीप यांनी पटकावला. तर मुलींच्या गोळा फेक स्पर्धेत दुरगुडे शिवानी गणेश हिने प्रथम क्रमांक तर थोरात तृप्ती सुरेश या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला. 100 मीटर धावणे स्पर्धेत मुलांमध्ये भद्रिगे द्विशांक अविनाश यांने प्रथम क्रमांक तर जगदाळे जगदीश अंकुश याने द्वितीय क्रमांक मिळविला. तर मुलींमध्ये जगताप जागृती ज्ञानेश्वर हिने प्रथम तर फारुकमलिक सायबा उमर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळी संस्थेचे खजिनदार अरूण हुलवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत गुंजाळ, संचालक व माजी अध्यक्ष किशोर कुऱ्हाडे, संचालक व पंचायत समिती जुन्नर सदस्य जीवन शिंदे, संचालक रमेश कुऱ्हाडे इ मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे विभाग अंतर्गत विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या 19 वर्ष वयोगटातील संघाचे तर १७ वर्ष वयोगटातील द्वितीय क्रमांक मिळवलेल्या मुलांच्या संघांचा सत्कार करण्यात आला. यातील 19 वर्ष वयोगटातील संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव ,खजिनदार व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. क्रीडा महोत्सवाच्या आयोजनात प्राचार्य उपप्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वृंद यांचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन व आभार औटी सर यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे