पुढील वर्षापासून थेट एटीएममधून पीएफचे पैसे
1 min read
दिल्ली दि.१३:- ईपीएफओ सदस्य पुढील वर्षापासून भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम थेट एटीएममधून काढू शकतील. केंद्रीय कामगार सचिव सुमिता डावरा यांनी बुधवार दि.११ रोजी ही घोषणा केली. कामगार सचिव म्हणाल्या की, नवीन सुविधेमुळे लाभार्थी थेट एटीएममधून हक्काची रक्कम काढू शकतात. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल. कामगार मंत्रालय आयटी प्रणालीमध्ये सुधारणा करत आहे. जानेवारी २०२५ पर्यंत मोठा बदल दिसून येईल.यापूर्वीच्या बातमीनुसार ईपीएफओ अंतर्गत पीएफसाठी एटीएमसारखे कार्ड जारी केले जाऊ शकते.
सध्या पैसे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर ७-१० दिवस प्रतीक्षा करावी लागते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ७ कोटींहून अधिक सक्रिय योगदानकर्ते आहेत. सुमिता डावरा पुढे म्हणाल्या, ईपीएफमध्ये अनाश्यक प्रक्रिया आम्ही हटवल्या आहेत.