पहाटे शौचास गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

1 min read

ओतूर दि.११:- शौचास गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला करून किरकोळ जखमी केल्याची घटना बुधवार दि.१२ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.या बाबत वनविभागाने दिलेली सविस्तर माहिती अशी की, रोजी प्रशांत डुंबरे उपसरपंच राहणार.

Oplus_131072

ओतूर यांचे भ्रमणध्वनी वरून मौजे ओतूर येथील कातकरी वस्ती येथील गुरुनाथ किसन वाघ (वय २७ वर्ष) ही व्यक्ती पहाटे ५ वाजता च्या सुमारास उघड्यावर शौचास बसली असताना त्यांचे वर बिबट वन्य प्राण्यांनी हल्ला करून किरकोळ जखमी केले आहे. असे समजताच सदर ठिकाणी तात्काळ वन विभागाचे पथक दाखल होऊन सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे उपचाराकरिता दाखल करून उपचार घेऊन पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करून पुढील उपचार चालू आहेत.

Oplus_131072

नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात ठोकळ हे समक्ष येऊन त्यांनी मा वैद्यकीय अधिकारी गायकवाड यांच्याशी चर्चा करून सदर जखमी व्यक्ती बाबत विचारपूस केली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर एल. व्ही. ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एम. बुट्टे वनपाल ओतूर, व्ही. ए. बेले वनरक्षक ओतुर, किशन केदार, फुलचंद खंडागळे, साहेबराव पारधी व रेस्क्यू टीम यांनी सदर ठिकाणी पिंजरा लावून बिबट वन्य प्राण्याबद्दल माहिती देऊन स्वसंरक्षणार्थ उपाययोजना सांगून जनजागृती करीत आहेत.

तरी वन विभागाकडून असे आवाहन करण्यात येते की पहाटे उघड्यावर शौचालयास जाऊ नये तसेच रात्री उघड्यावर झोपू नये व तसेच बिबटप्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवणे जेणेकरून रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्यप्राणी त्याची जागा बदलतील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे