राजुरीत बिबट्याच्या मृत्यूचे गूढ कायम; महिन्यात तीन बिबटे मृत
1 min read
राजुरी दि.१२:- जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाळीव प्राणी तसेच मनुष्य प्राण्यावरती बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. जुन्नरच्या पूर्व भागातील राजुरी येथे बिबट्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गावात एकाच महिन्यात तीन बिबटे मृत अवस्थेत आढळून आल्याने आता बिबट्यांची शिकार केली जात आहे. की, नैसर्गिक मृत्यू झाला याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.या महिन्यामध्ये पहिला बिबट्या डौलेमळा परिसरात रस्त्याच्या त्यानंतर फावडेमळा शिवरात तर त्यानंतर बुधवारी (दि.११) तिसऱ्या बिबट्याचा मृतदेह हातवळण शिवारात पिंपळगाव जोगा कालव्याच्या शेजारी राहणारे.
मोहन हाडवळे यांच्या घरा शेजारी गट नंबर २६४७ या शेतात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. मृत बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली.
त्यानंतर विभागाचे कर्मचारी वनपाल अनिल सोनवणे, वनरक्षक त्रिंबक जगताप, स्वप्निल हाडवळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला. बिबट्याचे दात, पंजा यासह इतर अवयव सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले होते.