गुंजाळवाडी शाळेत केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न

1 min read

आणे दि.६:- बेल्हे केंद्रातील चालू शैक्षणिक वर्षातील यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेचे यशस्वी नियोजन व आयोजन जि. प. प्राथ. शाळा गुंजाळवाडी (बेल्हे) शाळेत करण्यात आले होते.

केंद्रप्रमुख सोपान बेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंजाळवाडी शाळेचे शिक्षकवृंद पाटीलबुवा खामकर व तुकाराम खोडदे यांनी अतिशय सुरेख नियोजन करुन. केंद्रातील सहकारी शिक्षकांच्या मदतीने खेळीमेळीच्या वातावरणात कला क्रीडा स्पर्धा संपन्न केल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्वच शिक्षक बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. मा.तंटामुक्ती अध्यक्ष संजय बोरचटे यांनी स्पर्धकांना खाऊसाठी लाडूचे सौजन्य दिले. प्रसिद्ध उद्योजक सागर लामखडे यांनी स्पर्धकांसाठी मेडल व प्रमाणपत्र सौजन्य दिले. प्रभाकर गुंजाळ यांनी पाणी जार सौजन्य दिले.केंद्रातील शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन देण्यात आले. याप्रसंगी विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे यांनी भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच पारितोषिक वितरण केले. उद्घाटन प्रसंगी सरपंच नयना गुंजाळ, सागर लामखडे, संजय बोरचटे, किसन आप्पा बोरचटे, दिपाली बोरचटे, गोरक्षनाथ गुंजाळ, बबनराव गुंजाळ, भास्कर नरवडे, दत्तात्रय यादव, राहूल बोरचटे, शाळा समिती अध्यक्ष सतिश बोरचटे, उपाध्यक्ष मारुती बोरचटे, सखाराम गुंजाळ, केंद्रप्रमुख सोपान बेलकर, विलास पिंगट, अजित डेरे (smc अध्यक्ष) ज्ञानेश्वर पोपळघट, विशाल कोरडे, स्वाती शेलार, प्रियांका शिरसाट, रितेश देशमुख तसेच विविध शाळांचे पालकवर्ग, ग्रामस्थ इत्यादींची उपस्थिती लाभली.दिवसभर विविधांगी स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धकांना शालेय व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.जुन्नर विष्णू धोंडगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. इतर शाळांबरोबरच गुंजाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, लांब उडी, खोखो, भजन, लोकनृत्य इत्यादी स्पर्धांत प्राविण्य मिळवले.या स्पर्धेत केंद्रातील सर्व शाळांतील स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश बांगर यांनी केले. सूत्रसंचालन महादू कुरकूटे यांनी केले. तर आभार संतोष डुकरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे