राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये समर्थ फार्मसी ची सिद्धी चौरे राज्यात तिसरी
1 min read
बेल्हे दि.६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे (ता.जुन्नर) या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षामध्ये शिकत असलेली सिद्धी चौरे हिने एड्स जागरूकता प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक संपादन केल्याची माहिती समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके यांनी दिली.०१ डिसेंबर जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी एचआयव्ही आणि एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि एड्सची महामारी संपवण्यासाठी जनजागृती केली जाते.याच जनजागृतीसाठी सोसायटी ऑफ क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल प्रोफेशनल्स (SCRMP) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेल्या.
राष्ट्रव्यापी एड्स जागरूकता प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने असल्याकारणाने राज्यातून सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी विविध शाखांतून आपला सहभाग नोंदविला.या स्पर्धेत अंतिम वर्ष बी.फार्मसी मध्ये शिकत असलेल्या सिद्धी चौरे हिने १०० पैकी ९३ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकविला.
यानिमित्ताने एड्स बद्दलचे समज,गैरसमज आणि वास्तविकता या विषयावर समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉ.रमेश पाडेकर यांनी मार्गदर्शन केले.डॉ.राजेंद्र निचित यांनी एड्सपासून बचाव करण्यासाठी घ्यायची खबरदारी या विषयावर मार्गदर्शन केले.एड्समुळे जगभरात अनेक समस्या निर्माण होत आहेत.
त्यासाठी इलाजापेक्षा प्रतिबंध बरा हाच एक प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे डॉ.निचित म्हणाले.संस्थेच्या वतीने सिद्धी चौरे हिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,
कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले विभाग प्रमुख डॉ.सचिन दातखिळे, डॉ.विजयकुमार वाकळे, संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.