यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा महोत्सवामध्ये बेल्हे जिल्हा परिषद शाळेचे घवघवीत यश
1 min read
बेल्हे दि.६:- यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०२४-२५ अंतर्गत केंद्र पातळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी करण्यात आले. बेल्हे केंद्रामधील सर्व शाळांनी यामध्ये सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये 50 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, बेडूक उडी, वेषभूषा, वक्तृत्व, लेझीम भजन, खो-खो , प्रश्नमंजुषा अशा अनेक वैयक्तिक व सांघिक अशा क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हा नंबर १ या शाळेने सहभाग घेत घवघवीत यश मिळवले.
वैयक्तिक क्रिडा प्रकरात वकृत्व स्पर्धा – परशिस पंकज कुमार जैसवार- द्वितीय क्रमांक 50 मीटर धावणे – मुली- दुर्वा नंदू शिरतर – चौथी द्वितीय क्रमांक, लांब उडी मुले- साईराज स्वप्नील सावंत इयत्ता चौथी प्रथम क्रमांक, वेषभूषा स्पर्धा -स्वराली राहुल कोकणे इयत्ता दुसरी प्रथम क्रमांक, चमचा लिंबू – ऋत्वि निवृत्ती बांगर इयत्ता दुसरी द्वितीय क्रमांक,बेडूक उडी मुले- इमरान वसीम इनामदार प्रथम क्रमांक, बेडूक उडी मुली- अवनी अविनाश पारवे प्रथम क्रमांक,या सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले.
याबद्दल विस्तार अधिकारी विष्णू धोंगडे, केंद्रप्रमुख सोपान बेलकर, विषय तज्ञ- विलास पिंगट यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक हरिदास घोडे, सुवर्णा गाढवे, कविता सहाने, संतोष डुकरे, प्राविना नाईकवाडी, योगिता जाधव, सुषमा गाडेकर, अंजना चौरे यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ मूलमुले, उपाध्यक्ष सोईल बेपारी, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक ग्रामस्थ यांनी मार्गदर्शक शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व बीटस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.