कल्याण -नगर महामार्गावर पिकअप इनोव्हाचा भीषण अपघात ३ जागीच ठार, ३ गंभीर जखमी
1 min read
ओतूर दि.४:- कल्याण-नगर महामार्गावर ओतूर गावच्या हद्दीत वाटखल (ता.जुन्नर) इनोव्हा (MH 05 AS 6337 व पिकअपची (MH 14 GD 4074) समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात होऊन ३ जण जागीच ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात सोमवारी दि. ३ रात्री नऊ वाजता घडला.
हा अपघात इतका भीषण होता की दोन्हीही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे निदर्शनास येत आहे. या अपघातात राहुल प्रभाकर मुळे (रा. मांजरवाडी ता. जुन्नर), निखिल रोहिदास राऊत (रा. खेड), विकी सदाशिव त्रीपाठी (रा. घाटकोपर) हे तीन मृत्यू पावले आहेत तर योगेश शिवाजी हाडवळे रा. राजुरी (ता. जुन्नर), शैलेश नन्हे सिंग (रा. घाटकोपर) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच दोन्ही वाहने अतिशय वेगात असल्याचे या अपघाताचे मुख्य कारण आहे असे स्थानिक प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. स्थानिक नागरिक आणि ओतून पोलिसांची टीम यांनी अपघात स्थळी जाऊन तात्काळ मदत कार्य सुरू केलं होते.
दिवसेंदिवस या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून यावरती उपाययोजना करण्याची गरज दिसून येत आहे. मागच्या आठवड्यात आळेफाटा येथील लवणवाडी (ता.जुन्नर) जवळ पिकअप व दुचाकीचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच हा दुसरा अपघात घडला आहे. त्यामुळे रस्त्यावर ठीक ठिकाणी अपघात प्रवाह क्षेत्र असे बोर्ड लावावेत तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.