जुन्नर वनविभागामार्फत ८५ मेंढपाळ बांधवांना सुरक्षा तंबूचे मोफत वाटप

1 min read

जुन्नर दि.२७:- जुन्नर वनविभागामार्फत तालुक्यातील ८५ मेंढपाळ बांधवांना सुरक्षा तंबू (टेंट) मोफत देण्यात आले आहेत. या टेंटमुळे मेंढपाळ बांधवांना निश्चिंत व सुरक्षित झोप घेता येईल, तसेच विवट्यापासून देखील त्यांचे संरक्षण होणार आहे.मागील काही दिवसांपासून जुन्नर वनविभागाच्या हद्दीतील गावांमध्ये बिबट्यांकडून माननीय हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. मेंढ्यांच्या वाड्यावर घोड्यावर झोपणाऱ्या काही लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जुन्नर वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. केवळ जनजागृतीच नाही तर प्रत्यक्षात थेट मदत करून बिबट्यांपासून संरक्षण होण्यासाठी ज्या-ज्या आवश्यक उपाययोजना आहेत. त्या उपाययोजना वनविभागाकडून केल्या जात आहेत. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून मेंढपाळ बांधवांना हे सुरक्षा तंबू दिले आहेत. यापूर्वी जुन्नर वनविभागाकडून शेतकऱ्यांना घराच्या चहू लावण्यासाठी सौर कुंपण, अनायडरयंत्र, एआय आणि एज कॉम्प्युटिंग हे सायरन वाजणारे यंत्र अशा अनेक इतर उपाययोजना सातत्याने राबविल्या जात आहेत.शेतातच मेंढ्यांचे वाडे लागले जातात. मेंढपाळ बांधवांना रात्रीच्या वेळी वाड्यावरच मुक्काम करावा लागतो. त्यांची तिथे राहण्याची सोय नसल्याने त्यांना उघड्यावरच झोपावे लागते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय व कुटुंबातील इतर सदस्य देखील असतात. यापूर्वी उघड्यावर झोपलेल्या लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत, याची दखल घेऊन जुन्नर वनविभागाने उच्च प्रतीचे तंबू मेंढपाळ बांधवांना मोफत दिले आहेत. या तंबूमुळे मेंढपाळ बांधवांचे बिबट्यापासून तर संरक्षण होणारच आहे, शिवाय थंडीपासून देखील त्यांचे संरक्षण होणार आहे. हिवाळा, उन्हाळा व पावसाळा, अशा तिन्ही ऋतूंमध्ये या ट्रेनचा तंबूचा मेंढपाळ बांधवांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे मेंढपाळ बांधव अजित केसकर, महादू केसरकर, इंदूबाई माने यांना वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वनकर्मचारी खंडू भुजबळ यांनी टेंट दिले. यावेळी आपदा मित्र सुशांत भुजबळ, सचिन टाव्हरे, जयसिंग मुळे, शशिकांत मुळे उपस्थित होते. टेंट उभारण्यासाठी लागणारे साहित्य तंबूच्या किटबरोबर दिले आहे.जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमधील ८५ मेंढपाळ बांधवांना या टेंटचे वाटप करण्यात आले आहे. टेंट देतेवेळी मेंढपाळ बांधवांना बिबट्यापासून आपण आपले संरक्षण कसे करावे व काय दक्षता घ्यावी, याबाबत वनविभागाकडून मेंढपाळ बांधवांना मार्गदर्शन करून माहिती देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे