वळसे पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा
1 min read
निमगाव सावा दि.२६:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 11.00 वा. संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी संविधानाचे पूजन केले. तसेच सर्वांनी नेहमी संविधानाप्रती आदर ठेऊन संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आचरण करावे असा मोलाचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन भारतीय संविधान तयार केले. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. अनिल पडवळ यांनी भारतीय संविधानाची कलमे आणि भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले.
याबाबत भारतीय नागरिक आज जे सुख समाधानाने जीवन जगत आहे यामागे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा त्याग आहे. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे आपल्याला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले.
प्राध्यापक सुभाष घोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून संविधानाच्या सरनामेचे वाचन केले. तसेच संविधानाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते. विज्ञान शाखा प्रमुख प्रा. प्रवीण गोरडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.