जयहिंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधानाचे वाचन

1 min read

नारायणगाव दि.२६:- कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या जयहिंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य किरण पैठणकर यांनी संविधानाचे महत्व सांगितले. भारतामध्ये २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला. व २६ जानेवारी १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी असल्याचे विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून लक्षात येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे. जसे कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यां आधारे न केला जाणारा भेदभाव असे या संविधानाचे स्वरूप आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच मसुदा समिती आणि संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची माहितीही यावेळी देण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला, या प्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांच्याकडून शाळेला संविधानाची प्रत भेट देण्यात आली, सहशिक्षिका सुप्रिया शिंदे यांनी संविधानाचे वाचन केले. अशी माहिती जयहिंद इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य डॉ. के.एस.पैठणकर यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे