नळवणे येथील श्री कुलस्वामी खंडेरायाच्या यात्रे निमित्त रंगणार बैलगाडा शर्यती, जंगी कुस्त्यांचा आखाडा

1 min read

नळवणे दि.२:- महाराष्ट्राचे कुलदैवत नळवणे (ता.जुन्नर) गावचे श्रद्धास्थान श्री कुलस्वामी खंडेरायाची यात्रा चैत्र पौर्णिमे निमित्ताने गुरुवार दि ६ एप्रिल व शुक्रवार दि.७ एप्रिल रोजी संपन्न होणार असून त्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी गुरुवारी पहाटे श्रीस मंगल स्नान, अभिषेक, हनुमान जन्मोत्सव, मांडव डहाळे देवदर्शन, खोबरे भंडाऱ्यांची उधळण, श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक होईल सकाळी १० वाजता बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होतील.बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार असून प्रथम बक्षीस ४१ हजार, द्वितीय बक्षीस ३१ हजार, तृतीय बक्षीस २१ हजार चतुर्थ बक्षीस ११ हजार रुपये असणार आहे.

सतत तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळणाऱ्या गाड्यास १ लाख ५१ हजार रुपये बक्षीस असणार आहे.तर घाटाचा राजा साठी ७ हजार ७७७ रुपये बक्षीस असेल. रात्री ११ नंतर मायबोली हा महाराष्ट्रीयन लोकनृत्याचा कार्यक्रम होईल तसेच शुक्रवार दि.७ रोजी कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल. कुस्त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास १० हजार, द्वितीय क्रमांक मिळवल्यास ७ हजार, महिला पैलवानास ५ हजार रुपये असे बक्षीस असणार आहे. असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.


श्री च्या दर्शनासाठी, तळी भंडार करण्यासाठी हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणार आहेत. त्यामुळे भाविकांना श्री चे दर्शन सुलभ व्हावे म्हणून देवस्थान ने दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,सावलीची व्यवस्था केलेली आहे.देवस्थानने व ग्रामस्थांनी मिळून यात्रेचे नियोजन केले आहे. यात्रेनिमित्त मनोरंजनाचा कार्यक्रम, बैलगाडा शर्यती,कुस्त्यांचा आखाडा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा.अशी विनंती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे