अशफाक पटेल यांची व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तसेच नारायणगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड

नारायणगाव दि.२ – जुन्नर तालुक्यात सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवा शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष व सजग टाइम्सचे मुख्य संपादक तसेच जन आरोग्य समितीचे जुन्नर तालुका प्रतिनिधी पत्रकार प्रा.अशफाक पटेल यांची व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघाच्या डिजीटल विभागच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सदर निवड व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, डिजीटल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, सरचिटणीस अभिजीत कांबळे यांसह महाराष्ट्र कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. तसेच अशफाक पटेल यांची नारायणगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार महेश लांडगे, चेअरमन सत्यशील शेरकर, मंगलदास बांदल, जिल्हा नियोजन सदस्य आशाताई बुचके, तालुकाध्यक्ष संतोष खैरे, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना माळवदकर, आशिष माळवदकर, सरपंच योगेश पाटे, उद्योजक अभय कोठारी, ऍड. कुलदीप नलावडे, तसेच पुणे जिल्ह्यासह जुन्नर, नारायणगाव व परिसरातील सामाजिक, राजकीय, पत्रकारिता यांसह विविध संस्था व मान्यवरांकडून सदर निवडीबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यानिमित्ताने अशफाक पटेल म्हणाले की, डिजिटल मीडियाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पत्रकार संघाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. ‘डिजिटल मीडिया’चे काम करणाऱ्यांना सर्व पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी वरिष्ठांच्या सहकार्याने काम करून संघटना बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच, संघटनेची ध्येय धोरणे पत्रकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून विविध शिबिर आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून डिजिटल पत्रकारांना प्रशिक्षित करू असा विश्वास त्यांनी नियुक्ती निमित्त व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे