महात्मा फुले ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न

1 min read

मंचर दि.१:-महात्मा फुले ब्रिगेडच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविकिरण हॉटेल (ता. आंबेगाव) येथे संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदास महाजन, प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय चांबारगे, प्रदेश सरचिटणीस उत्तम गोरे, राज्य मार्गदर्शक मेघराज पवळे, युवक आघाडी प्रदेश सरचिटणीस शाम गोरे, युवक आघाडी संपर्क प्रमुख सुनील मांजरवाडे, लातूर जिल्हा सचिव देवराज गोरे, मेळाव्याचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता शिंदे,

महिला आघाडी अध्यक्ष कविता जकाते, यांनी केले,उपस्थित मध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्ष वसंत काफरे, पुणे जिल्हा सचिव मनिष गडगे, जुन्नर तालुका अध्यक्ष संजय डोके, खेड चाकण तालुका अध्यक्ष प्रितम शिंदे, खेड तालुका संपर्क प्रमुख बाळासो डोके, जुन्नर तालुका महिला आघाडी अध्यक्ष धनश्री बनकर, शिरूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सुवर्णा भुजबळ, सचिव जयश्री रासकर, निर्मला अभंग, इशा जकाते, रीना संतोष डोके, आंबेगाव तालुका उपाध्यक्ष सावता झोडगे, संपर्क प्रमुख सचिन कानडे, तालुका संघटक सागर भास्कर, जुन्नर शहर अध्यक्ष श्रीकांत मिरगुंडे, जुन्नर तालुका उपाध्यक्ष ओंकार मेहेर, सोपान घोलप, सुषमा गायकवाड, एकलहरे उपसरपंच दीपक डोके, राहुल डोके, सागर मंडलिक, दीपाली गडगे, अमोल राऊत, अविनाश बनकर, देविदास डोके आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महात्मा फुले ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांनी संघटनेच्या योजना सावित्रीआई फुले शिष्यवृत्ती योजना, श्री संत सावता महाराज पेन्शन योजना, महात्मा फुले स्वावलंबी योजना, सावित्री-जोती विवाह योजना, यशवंत योजना, नागुबाई कन्यारत्न विवाह योजना ह्या योजनेची सविस्तर माहिती दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे