समर्थ गुरुकुलमध्ये बालदिनानिमित्त रांगोळीतून मतदान जनजागृती
1 min readबेल्हे दि.१४:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बांगरवाडी, बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये नुकताच बालदिन मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला.समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक व शिक्षक मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.समर्थ गुरुकुलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उत्कृष्ट रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीच्या माध्यमातून मतदारांना महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती अभियानाबद्दलची माहिती रांगोळीतून दर्शविण्यात आल्याची माहिती समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.मतदार जनजागृती अभियान प्रमुख व संस्थेचे क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे आणि पर्यवेक्षक सखाराम मातेले यांनी बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना बाल दिनाचे महत्त्व तर पटवून सांगितलेच परंतु त्याचबरोबर मतदानाचे महत्त्व देखील पटवून सांगितले.सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या घरातील आई, वडील भाऊ तसेच इतर नातेवाईक यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. मतदानाचा हक्क बजावताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारालाच आपले मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.गुरुकुल च्या कला शिक्षिका दीप्ती चव्हाण, दिपाली भांबेरे व मनीषा शेळके यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने उत्कृष्ट अशी मतदान जनजागृती ची रांगोळी प्रवेश दारासमोर काढली होती. ही रांगोळी पाहण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट दिली.ही मतदान जागृती अभियान जुन्नर तालुका निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे,तहसीलदार डॉ.सुनील शेळके,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी व स्वीप नोडल अधिकारी १९५ जुन्नर अनिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेली होती.संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, सारिका शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, रिसर्च व इनोवेशन सेल, इंटरनॅशनलायझेशनचे संचालक डॉ.प्रतीक मुणगेकर, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी कौतुक केले.