व्ही.जे इंटरनॅशनल बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम

1 min read

वडगाव कांदळी दि.१४:- ‘प्रत्येक मुलात एक कलाकार आहे, आणि त्या कलाकाराला जपा आणि वाढू द्या ‘बालदिन’ शुभेच्छा!”विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘बालदिना’ निमित्त विविध मनोरंजक खेळ, गप्पा-गोष्टी व बालचित्रपट या द्वारे मनमुराद आनंद लुटला.

सर्वप्रथम शालेय परिपाठामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या समन्वयिका,सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत शिक्षका वर्षा सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच मुलांचे लाडके चाचा नेहरू यांच्या विषयी व बाल दिनाबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून त्यांचा सहभागही घेण्यात आला. ‘लहान मुलं म्हणजे देवा घरची फुलं’. लहान मुलांना हर प्रकारे आनंद देण्याचा हक्काचा दिवस म्हणजे ‘बालदिन’. ‘बालदिन’ म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस होय. या बाल दिनाच्या निमित्ताने नर्सरी ते सिनिअर के. जी मधील विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक खेळाचा आनंद घेतला; तर इ.1ली ते इ.10 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रबोधन करणारे मनोरंजक चित्रपट दाखविण्यात आले. विविध मैदानी खेळ देखील विद्यार्थ्यांनी खेळत, इ. 4 थी मधील विद्यार्थिनी व शाळेच्या शिक्षीकांनी मिळून छान नृत्य करून ‘बालदिनाचा’ खराखुरा आनंद लुटला. तसेच शिक्षिका कीर्ती जगताप यांनी सूत्रसंचालन केले.बालदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विशाल जुन्नर सेवा मंडळाकडून खाऊ वाटपही करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे