मॉडर्न च्या विद्यार्थ्यांचे मानवी साखळीद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

1 min read

आणे दि.१४:- विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात यावेळीही सर्वाधिक मतदान होण्याचे उद्दीष्ट ठेवून जनजागृतीसाठी नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात दररोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत गुरुवार (दि.१४) बाल दिनाच्या दिवशी मॉडर्न इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) च्या मैदानात ३०० विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून Please Vote ‘मतदान करा’ याद्वारे मतदारांचे लक्ष वेधले. यावेळी शाळेच्या शिक्षिका रुपाली बांगर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिल, नातेवाईक तसेच सर्व मंडळींना मतदान करण्याचं सांगा असे आवाहन विद्यार्थांना केले व मतदान का करावे हे पटवून सांगितले. यावेळी शाळेच्या प्राचार्य विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे उपस्थित सर्व शिक्षक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे व यांनी विद्यार्थ्यांना स्वतः चा भावी जीवनात तसेच घरी व शेजारी नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्याचे आवाहन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे