समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरी पूजन व याग संपन्न
1 min readबेल्हे दि.३०:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बेल्हे येथे नुकतेच दीपावली व राष्ट्रीय आयुर्वेदिक दिनाचे औचित्य साधून धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरी पूजन व याग संपन्न झाला.संस्थेचे सचिव विवेक शेळके व सारिका शेळके यांच्या शुभहस्ते धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके उपाध्यक्ष माऊली शेळके विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉ.रमेश पाडेकर, डॉ.राजेंद्र निचित, डॉ.शिरीष गांधी, डॉ.नूतन गांधी, डॉ.मीनाक्षी काकडे, डॉ.दिपक हांडे, डॉ.शिवाजी खेमनार, डॉ.जयश्री चव्हाण, डॉ.मीनाक्षी तोरणे, डॉ.विजया हांडे डॉ.शिल्पा भोर, डॉ.कविता आहेर, डॉ.शुभांगी कोकाटे, यशवंत फापाळे, लॉ कॉलेजचे प्रा.शिवाजी कुमकर, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि नर्सिंग कॉलेज चे सर्व स्टाफ उपस्थित होते.राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे महत्त्व सांगताना डॉ.रमेश पाडेकर व डॉ. राजेंद्र निचित म्हणाले की, आपल्या भारत देशाला प्राचीन संस्कृतीचा फार मोठा वारसा आहे. भारतीय संस्कृतीने जीवनावश्यक ज्ञान लहानसहान गोष्टीतून नित्य जीवनात रुजवलेले आहे. निरामय आरोग्य हेच सर्वात मोठे धन असून धन्वंतरी हे वैद्याचे देव आहेत. जगाला हेवा वाटावा असेआपले आयुर्वेदिक शास्त्र आहे. आयुर्वेद हा अर्थव वेदाचा उपभाग आहे. आयु म्हणजे जीवन आणि हे जीवन निरामय कसे राहावे हे शिकवणारी विद्या म्हणजे आयुर्वेद. वनस्पतीजन्य औषधी आणि वनौषधी तसेच ऋतूनुसार आहार नियम, व्यायाम प्रकार यावर आधारलेली ही विद्या म्हणजे आयुर्वेद. महर्षी चरक, सुश्रुत, कश्यप वाग्भट,कृषी माधव आदींनी अभ्यासांती हे ज्ञान आपणा सर्वांपर्यंत पोहोचवलेले असून भारतात अनादी काळापासून शस्त्रक्रियाही होत आलेल्या आहेत. मनुष्याने सतत कार्यरत राहावे,bधनप्राप्तीने कुटुंब सुखी ठेवावे यासाठी आयुर्वेदाचा स्वीकार करून निरामय आरोग्य सर्वांना लाभावे अशी यावेळी धन्वंतरी देवाकडे प्रार्थना करण्यात आली.यावेळी डॉ.राजेंद्र निचित यांनी समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल च्या वतीने माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या पंचकर्म उपचार, सर्व रोग निदान उपचार व मोफत सल्ला केंद्राविषयी माहिती दिली. हॉस्पिटलच्या वतीने माफक दरात आयुर्वेदिक व इतर औषधे, विविध शस्त्रक्रिया, विशेष सवलती तसेच राबवण्यात येणाऱ्या शिबिरासंबंधी उपस्थितांना माहिती दिली.