समर्थ आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये ‘धन्वंतरी याग’ चे आयोजन
1 min read
बेल्हे दि.३०:- समर्थ आयुर्वेद हॉस्पिटल व रिसर्च सेंटर बांगरवाडी या ठिकाणी धनत्रयोदशीच्या व धन्वंतरी जयंती तसेच राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित धन्वंतरी याग चे आयोजन करण्यात आले.ॐ नमो भगवते वासुदेवाय धन्वंतराय अमृता-कलशा हस्तायसरवा-अमाया विनाशाय त्रैलोक्य नाथाय धन्वंतरि महा-विष्णवे नमः।धन्वंतरी मंत्र याने यागाची सुरुवात करून पुजेची सुरुवात करण्यात आली त्या प्रसंगी वल्लभ शेळके यांनी मागर्दर्शन करताना भारतीय संस्कृतीने जीवनावश्यक ज्ञान लहानसहान गोष्टीतून नित्य जीवनात रुजविलेय.
पूजेवेळी मूर्ती प्रतिमेसमोरच्या तांब्याचा कलशातील जल ज्यामध्ये तुलसीपत्रही असते ते प्राशन करण्याचे हे महत्व. तर निरामय आरोग्य लाभावे म्हणून या संस्कृतीला वरदान लाभलेय ते आयुर्वेदाचे. आदिअनादी भारतीय संस्कृतीच्या स्वर्णमय इतिहासाचा हा पूरावा.
यामुळेच “करारे हांकारा, पिटारे डांगोरा, नगरात कुणी उपाशी.. दुःखी आहे का याचा शोध करा” म्हणून दवंडी दिली तरीही कुणी सापडत नसे. याचे कारण लोकांजवळ धनही होते आणि व्याधीही नव्हत्या.भारताला या देशातील ऋषीमुनीनी संपन्न केलेय.
प्रत्येकानेच सुखी, सुसंपन्न, धनवान आणि आनंदी रहावे ही परमेश्वराचीच इच्छा आहे. निरामय आरोग्य हे सर्वात मोठे धन. वैद्यांना देव मानतात. धन्वंतरी हे वैद्याचे देव. जगाला हेवा वाटतो तो आयुर्वेद शास्त्राचा. अमृत कलश ठेवा बहाल केलाय तो समुद्र मंथनातून प्रकटलेल्या धन्वतंरीनी या धन्वंतरीचे पूजन होणार.
आयुर्वेद हा अथर्वेदाचा उपभाग. आयु म्हणजे जीवन. हे जीवन निरामय कसे रहावे हे शिकवणारी विद्या. वनौषधी.. वनस्पतीजन्य औषधी. ऋतूनुसार आहार नियम. व्यायामप्रकार यावर आधारलेले ही विद्या.महर्षी चरक,सुश्रुत, कश्यप,वाग्भट,ऋषी माधव आदिनी अभ्यासांती हे ज्ञान आम्हापर्यन्त पोहोचवले भारतात अनादी काळापासून शस्त्रक्रियाही होत होत्या.
मुबलक दुष्परिणाम न करणारी औषधे होती हे सिद्ध करणारा हा वेद. आयुर्वेद. भारताच्या नालंदा. तक्षशिला इ. विद्यापीठातून हे ज्ञान जगात पसरले.दिपोत्सवाचा आनंद लुटण्यास प्रत्येक घरी धन यावे. अर्थकारणास गती देणारी दिवाळीत नूतन खरेदी परंपरा. जुन्या पणत्या घरी कितीही असोत.
तरीही किमान पाच मातीच्या नविन पणत्या विकत घेणे शुभदायी मानून दिवाळी खरेदी प्रारंभ करण्याची ही परंपरा. मनुष्याने सतत कार्यरत रहावे, धनप्राप्तीने कुटुंब सुखी ठेवावे यासाठी काही कथा प्रचलीत आहेत. सोन्या चांदीच्या लखलखाटाने डोळे दिपून सर्परुपाने आलेला यमदूतही परतल्याने यमासाठी दक्षिणेकडे दिव्याची ज्योत ठेवून पूजन होणार.
यालाच यमदीपदान म्हणतात. अकाली मृत्यू येवू नये या साठी हे श्रद्धेचे पूजन.घरोघरी या मंगलमय दिवाळीच्या तयारीत सगळ्या मैत्रिणी दंग आहेत. विविध रंगी फुलांचे हार.. तोरणे.. गजरे, माळा ओवल्या जात आहेत. अंगणे रांगोळीने सजलीत. दारी आकाशदिवे चमकत आहेत.
तर भरजरी शालूतील औक्षणासाठी सिद्ध रमणीय महिलांच्या हातातील सोन्याच्या ताटातील दिव्यांच्या ज्योती माणिकाप्रमाणे लखलखत आहेत.दीपोत्सवाचा आनंद व्दिगुणीत होतो तो संगीताने. यामुळेच गावोगाव सध्या ‘दिवाळी पहाट’ चे कार्यक्रम सुरू आहेत.
प्रत्येक कार्यक्रम हा शंभर नवे गायक.. हजारो रसिक जन्माला घालतोय. या कार्यक्रमांच्या आयोजकाना याचे श्रेय जातेय.आपणांस धनत्रयोदशीच्या आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!सदर याक साठी संस्थेचे सचिव विवेक शेळके सर व सारिका शेळके व हॉस्पिटलचे वतीने डॉ रमेश पाडेकर त्यांची पत्नी हे होम साठी व पूजेसाठी बसले होते.
स्नेहल शेळके,प्रदीप गाडेकर,डॉ निचित. डॉ.कोकाटे, डॉ.आहेर.डॉ.चव्हाण,डॉ आहेर डॉ.खेमनार,डॉ. गांधी,डॉ काकडे यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते. हॉस्पिटल स्टाफ व नर्सिंग स्टाफ यांनी रांगोळी व हॉस्पिटल सजावट अतिशय सुंदर प्रकारे करण्यात आली. या कार्यक्रमा नंतर सर्व स्टाफ साठी दिवाळी मिठाई वाटप करण्यात आली. अशी माहिती यशवंत फापाळे यांनी दिली.