व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल मध्ये- ‘इको फ्रेंडली’ दिपावली उत्सव संपन्न
1 min read
नगदवाडी दि.२८:- ‘विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित’ व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये ज्युनिअर के.जी, सिनिअर के.जी, नर्सरी तसेच इ.1 ली ते इ.10 वी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी ‘इको-फ्रेंडली’ स्वरूपाची व प्रदूषण विरहीत दिवाळी कशी साजरी करावी हे पटवून दिले. हा उत्सव संपन्न करण्यासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वर्गशिक्षकांच्या उपस्थितीत इ.1 ली व इ.2 री मधील विद्यार्थ्यांनी दिपावलीचा दिवा सजवणे तर इ .3 री,
इ.4 थी व इ.5 वी मधील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक आकाशकंदील व भेटकार्ड बनवणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नर्सरी क्लास ते सिनियर के.जी या विद्यार्थ्यांनीही रांगोळी काढणे, पणती सजविणे याद्वारे दिपावली उत्सवाचा आनंद घेतला.
इ.5 वी ते इ.10 वी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी “किल्ले बनवणे स्पर्धा” मुलांसाठी तर मुलींसाठी “रांगोळी स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांनी किल्ले संरक्षण, पर्यावरण-निसर्ग यांचे संरक्षण, ऐतिहासिक माहिती मिळवणे- तसेच विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देत.
व प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करून ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश मुलांनी व शाळेने सर्वांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. किल्ले बनविणे व रांगोळी स्पर्धा यासाठी विद्यार्थ्यां समवेत प्रतापगड, रायगड, शिवनेरीगड, सिंहगड या हाऊसेस चे इनचार्ज टीचर व विद्यार्थी आणि खूप मेहनत घेतली.
कला शिक्षक व इतर सर्वच शिक्षकांची मेहनत व कष्ट दिसून आले. शाळेच्या शिक्षिका गौरी भोर व शिवानी कुलकर्णी यांनी ‘दिपाली उत्सव’ व त्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका व समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे तसेच सर्व शिक्षक यांनी दिप प्रज्वलन केले व ‘दिपावली उत्सव’संपन्न करण्यात आला. सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.