कोल्हापूर परिक्षेत्रात ६.६४ कोटी रोख रक्कम जप्त; पोलिस यंत्रणा २४x७ सज्य:- सुनिल फुलारी

1 min read

कोल्हापूर दि.१४:- विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने दि.१५.१०.२०२४ रोजी पासुन आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय, शस्त्रे, अंमली पदार्थ, दारु, अवैध रोख रक्कम, freebies (भेट वस्तु) यावर प्रभावी व गुणांत्मक कारवाई सतत करणेबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी अधिनस्त सर्व ५ जिल्हयांचे पोलीस अधीक्षक यांना सुचित केले होते.त्या अनुषंगाने घटकांकडून प्रभावी कारवाई खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे.दिनांक १०/११/२०२४ रोजी पर्यंत परिक्षेत्रात एकुण ६.६४ कोटी रोख रक्कम, २.८३ कोटी रुपये किंमतीची दारु व रसायन,२२,२४,६६५/- हजार रुपये किंमतीचा ११३ किलो गांजा, ७.५७ कोटीचे ९ किलो सोने व ६० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १.८७ कोटी किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. असे एकुण १९.१३ कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. दि.१०/११/२०२४ पर्यत BNSS कलम १२६ अन्वये परिक्षेत्रात २४०४७, BNSS कलम १२८ अन्वये २४३, BNSS कलम १२९ अन्वये १८२४, BNSS कलम १७० अन्वये २७, BNSS कलम १३५ (३) अन्वये ८१३६, MPDA अंतर्गत २, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये १८, ५६ अन्वये ७९, ५७ अन्वये ०७, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये (MCOCA) १ (७ आरोपी) या प्रकारे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या आहेत. पुढे कारवाई सुरु आहेत.दि.१०/११/२०२४ पर्यत एकुण २३ अवैध अग्निशस्त्रे व ३६ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत. सर्व आरोपींवर शस्त्र अधिनियम कलम ३,२५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.दि.१०/११/२०२४ पर्यत परिक्षेत्रात आदर्श निवडणुक आचारसंहिता उल्लंघनाच्या अनुषंगाने कोल्हापूर घटकांत ३ दखलपात्र व ९ अदखलपात्र, सांगली घटकात १ दखलपात्र, २ अदखलपात्र, सोलापूर ग्रामीण घटकात १ दखलपात्र व १ अदखलपात्र व पुणे ग्रामीण घटकांत ५ दखलपात्र व ३ अदखलपात्र असे. एकुण १० दखलपात्र व १५ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयांचा वेळेत तपास करुन दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करणेबाबत व आरोपींवर निवडणुक संदर्भाने प्रतिबंधक कारवाई करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. कार्यवाही सुरु आहे.या नाक्यावर RTO, GST, Excise, Forest या विभागाचे प्रतिनिधी Joint integrated post management अंतर्गत तैनात आहेत. या नाक्यावर नार्कोटिक्स श्वानाचा वापर करण्याबाबत कार्यवाही सुरु करणेत आली आहे.विधानसभा निवडणुक अनुषंगाने परिक्षेत्रातील सर्व घटक प्रमुखांची बैठक घेण्यात आलेली आहे. प्रभावी छापा कारवाई, प्रभावी व गुणात्मक प्रतिबंधक कारवाई,उपद्रवी घटकांवर कायदेशीर कारवाई, अजामीनपात्र वॉरंटची बजावणी, कोबिंग ऑपरेशन, संवेदनशील भागात रुट मार्च या सारख्या कारवाई सुरु आहेत व पुढेही करण्यात येत आहेत. विशेष निवडणुक निरीक्षक यांचेसोबत बैठक झालेल्या आहेत. सुचनांची अंमलबजावणी सुरु आहे. हद्दपार प्रकरणे, MPDA प्रस्ताव याबाबत सर्व जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी यांचेसह संनियंत्रणा बाबत विभागीय आयुक्तांसोबत समन्वय बैठक झाली आहे.निवडणुका निपक्षपाती, निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी पुर्ण उपाययोजना पोलीस विभागामार्फत करण्यात आली आहे. नागरिकांना विनंती आहे की, सर्वांनी आपला मतदानाचा हक्क पुर्णपणे बजावावा.यापुढील काळात सुध्दा अवैध व्यवसायावर अधिक प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे