साकुर दरोड्यातील अरोपी पोलिसांच्या जाळ्यात

1 min read

साकुर दि.१२:- संगमनेर तालुक्यातील साकूर येथे सोमवार दि.११ दुपारी दीड वाजता पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याच दूकान लूटून नेल्याची घटना घडली होती. विशेषतः भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तसेच दूकानाबाहेर येऊन या दरोडेखोरांनी हवेत फायरिंग करत तेथूनच पसार झाले होते. या दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांच पथक रवाना झाले होते.

दरम्यान पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोराला पारनेर तालुक्यातील कुरणवाडी – जांभुळवाडी परिसरातून जेरबंद करण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आलीय. यापैकी एक दरोडेखोर बारामतीचा असल्याची माहिती समोर आलीय. तसेच मोटारसायकल ही ताब्यात घेतल्या आहेत. उर्वरित ३ दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. दरम्यान सदर दरोडेखोर डोंगरात लपून बसलेली माहिती पोलिसांना मिळाली होती.मात्र घटनास्थळापासुन 25 किलोमीटर अंतरावरच वासुंदे ता.पारनेर शिवारात काल दुपारपासुनच पोलीसांनी आरोपींची नाकाबंदी केली होती.

अक्षय बाळासो वावरे, वय 24 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे, स्वप्नील किशोर येळे, वय 22 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे