आळेफाटा पोलिसांनी ५ लाख ९२ हजार रुपयांचा गांजा केला जप्त; दोघे जेरबंद

1 min read

आळेफाटा दि.३१:- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुशंगाने आळेफाटा पोलीस स्टेशनकडून पोलीस स्टेशन हद्दीत नाशिक रोडवरील बोटा खिंड, येथील एस. एस. टी. पथकाची नाकाबंदी नेमण्यात आली असुन त्या अनुशंगाने दिनांक २९ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ट्रक कमांक एम.एच.१४ जी.यु.८०८८ हा नाकाबंदी पॉईंटवर आला असता. पोलीसांनी सदर ट्रक थांबवून त्यांची तपासणी केली असता सुरवातीला ड्रायव्हरने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांना संशय आला असता त्यांची कसुन तपासणी केली असता त्यामध्ये २३.७१९ किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला, पोलीसांनी लागलीच ट्रक ड्रायव्हर १) सुदर्शन गोविंद डोंगरे वय २४ वर्षे रा. काळवाडी ता. जुन्नर जि. पुणे २) देवसुंदर अमलेश मैथी वय ४८ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. दुर्गाचौक उत्तर दक्षिण पल्ली, हलदीया, पुर्व मेदिनीपूर, दुर्गाचौक, वेस्ट बंगाल ७२१६०२ यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी ओडीसा येथून गांजा आणल्याचे कबूल केले. असुन सदर गुन्हयातील आरोपींना अटक करण्यात आली असून सदर त्यांच्या कडुन ५ लाख ९२ हजार ९७५ रुपयांचा गांजा व ४५ लाख रुपयांची गुन्ह्यात वापरलेली दुधाची व्हॅनची असा एकुन ५० लाख ९२ हजार ९७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सो, सहा. पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भिमा लोंढे, पोपट कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल शैलश वाघमारे, दिपक नांगरे, भुजंग सुकाळे, अमित माळुंजे, सचिन कोबल यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे