श्री विघ्नेश्वराचा आशीर्वाद, घेऊन सत्यशील शेरकर यांचा उमेदवारी अर्ज
1 min read
ओझर दि.२९:- अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझर येथील श्री विघ्नेश्वराची आरती करत कुटुंबातील सदस्य व तालुक्यातील मित्रपरिवारासह दर्शन घेऊन आणि अभिषेक करून महाविकास आघाडीच्या तमाम सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि जुन्नर विधानसभा मतदार संघाचा उमेदवारी अर्ज विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल दाखल करत आहे.महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थना श्री विघ्नेश्वराच्या चरणी केल्याची माहिती शेरकर यांनी दिली. यावेळी बाळासाहेब कवडे, तुषार कवडे, दत्तू कवडे, विश्वास कवडे, सूर्यकांत कवडे उपस्थित होते.