मनोज जरांगे समर्थक योगेश तोडकर यांचा अर्ज दाखल

1 min read

जुन्नर दि.३०:- मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनानुसार जुन्नर १९५ विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी मंगळवार दि. २९ रोजी मराठा समाज व शेतकरी प्रतिनिधी योगेश रामदास तोडकर यांनी अर्ज दाखल केला. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे ३०/१०/२०२४ रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा बांधवांना पुढील दिशा व विधानसभे संदर्भात निर्णय सांगणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार जुन्नर विधानसभेसाठी अर्ज भरलेला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पंचायत समिती जुन्नर येथे अखिल भारतीय शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील मराठा सेवा संघ अध्यक्ष गणेश महाबरे,संदेश बारवे, मुकुंद डोंगरे, विकास सोसायटी गुंजाळवाडी चेअरमन प्रकाश तोडकर, गुंजाळवाडी तंटा मुक्ती माजी अध्यक्ष अमित चव्हाण, स्वनंद ढवळे, सत्यवान खांडगे, विकास डोंगरे सुरज शिंदे, महेंद्र फापाळे अदी मराठा प्रतिनिधी व हजारोंच्या संख्येने शेतकरी व मराठा बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे