जुन्नर मतदार संघात ११ उमेदवारांचे अर्ज दाखल
1 min read
जुन्नर दि.२९:- जुन्नर विधानसभा मतदार संघात आज आमदार अतुल बेनके, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, आशा बुचके, देवराम लांडे यांच्यासह एकूण ११ उमेदवारांनी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली.सोमवार दिनांक २८ रोजी विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यासह भाजप नेत्या आशा बुचके, माऊली उर्फ ज्ञानेश्वर खंडागळे यांनी शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले तर रमेश हांडे, देवराम लांडे, काळू गागरे व माजी आमदार शरद सोनवणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी जिल्हाप्रमुख सुनील मेहेर, माजी तालुका समन्वयक प्रसन्ना डोके, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, तालुका समन्वयक बाबा परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार माजी जिल्हा परिषद सदस्य फुलवडे बाळासाहेब खिलारी
मा. पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके, विधानसभा संघटक बाबूभाऊ पाटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्कर गाडगे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, मा. पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.