विद्यानिकेतन येथे रंगली दिपावली कॉर्नर डेकोरेशन स्पर्धा; पृथ्वी हाऊसचा प्रथम क्रमांक

1 min read

साकोरी दि.२६:- विद्यानिकेतन म्हटलं की नेहमीच काहीतरी नवीन नवीन उपक्रम राबवले जातात. या ही वर्षी परीक्षा संपल्यानंतर विद्यालयात दिवाळी कॉर्नर डेकोरेशन स्पर्धा हाऊस नुसार घेण्यात आली. वायू (Air ,अग्नी (Fire ) ,पृथ्वी (Earth ) जल (water) या हाऊस च्या विद्यार्थ्यांनी, हाऊस मास्टर, हाऊस कॅप्टन यांनी आपल्या आपल्या हाऊस नुसार दिवाळी कॉर्नर डेकोरेशन मध्ये सहभाग नोंदवला. अतिशय सुंदर अशी सजावट विद्यार्थ्यांनी यावेळी केली. या बद्दल विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रुपाली पवार – भालेराव यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाशिक्षक विनोद उघडे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पृथ्वी (Earth), द्वितीय क्रमांक वायू (Air), तृतीय क्रमांक जल (Water) तसेच चतुर्थ क्रमांक अग्नी (Fire ) या हाऊस ने प्राप्त केला .सर्वांना संस्थापक अध्यक्ष पांडुरंग साळवे यांनी दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे