धनंजय मुंडेंच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ

1 min read

बीड दि.२६:- कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना परळीतून महायुतीचे उमेदवार म्हणून तिकीट देण्यात आले. त्यानुसार त्यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अत्यंत साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, यावेळी भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटकपक्ष महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होते.धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र देखील दाखल केले. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्याकडे जवळपास ५३.८० कोटी रुपयांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे २०१९ मध्ये २३ कोटींची संपत्ती होती. तर २०२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात ५३.८० कोटींची संपत्ती नमूद करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे १५ कोटींची वाहने, दीड किलो चांदी आहे. वाहनांमध्ये अगदी तब्बल ५३.८० कोटींच्या संपत्तीचे आहेत. मालक टँकरपासून ते बुलेटपर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे. सात लाख तीन हजार रुपयांचे १९० ग्रॅम सोने आहे. त्यांच्या विरोधात आता शरद पवार कोणाला उतरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.दरम्यान, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुनील गुट्टे यांनी केला आहे. शेतकरी संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे