महाविकास आघाडीत जुन्नरची जागा शिवसेनेलाच मिळेल:- माऊली खंडागळे
1 min read
नारायणगाव दि.२१:- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीत जुन्नरची जागा शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच स्थानिक पातळीवर जोमाने काम करण्याच्या सूचना खंडागळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.यावेळी उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, तालुका अध्यक्ष व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, मा. तालुका समन्वयक प्रसन्न डोके, विधानसभा संघटक बाबू पाटे, तालुका समन्वयक बाबा परदेशी,
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्कर गाडगे, उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, उपतालुका प्रमुख बन्सी चतूर, उत्तम काशीद, मोहन बांगर, चंद्रकांत डोके, विश्वास इसकांडे, आरीफ आतार, सुनील पवार, राहुल सुकाळे, तालुका युवा अधिकारी विकी पारखे, संदिप ताजणे, शांताराम सावंत, विभाग प्रमुख खंडू शिंदे,
विभाग प्रमुख अजित सहाणे, संजय बनकर, वैभव नलावडे, श्रीहरी हाडवळे, सुधाकर शिंदे, राजेंद्र कुलवडे उपविभाग प्रमुख संभाजी नेहरकर, पांडुरंग गाडेकर , सुरेश चौगुले, सुनिल जाधव, रामदास नायकोडी, रोहिदास गोरडे, विठ्ठल वायकर, संतोष पांडे, विठ्ठल रावते, दिनेश आहेर शहरप्रमुख संतोष वाजगे, समीर भगत तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.