गुंजाळवाडीच्या देवस्थानाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळून दिल्याने आमदार अतुल बेनके यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

1 min read

गुंजाळवाडी दि.२०:-वारकरी संप्रदायाची परंपरा आणि समृध्द वारसा लाभलेल्या गुंजाळवाडी (ता.जुन्नर) गावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी चे आणि श्री हनुमान देवतेचे मनोभावें दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी आनंदाने आणि आपुलकीने स्वागत केले. हभप. सहादूबाबा वायकर महाराज यांची ही जन्मभूमी, या गुंजाळवाडी गाव आणि परिसरातील विविध विकास कामे सातत्याने सुरू आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर श्रीक्षेत्र गुंजाळवाडी येथील श्रीराम पंचायतन ट्रस्ट ला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा शासनाच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला व अतुल बेनके यांचा सन्मान करून आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे