आमदार अतुल बेनके यांनी दिल्या मोहटादेवी दर्शनाला जाणाऱ्या महिलांना शुभेच्छा

1 min read

बेल्हे दि २०:- महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माहुरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू, जागृत व भक्तांच्या नवसाला पावणारी आई श्रीक्षेत्र मोहटादेवीगड निवासिनी श्री मोहटादेवी दर्शन घेण्यासाठी जुन्नर तालुक्यातील महिलांनी आज प्रस्तान केले.

तालुक्यातील माता माऊली भगिनींसाठी बेनके परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. मोहटादेवी दर्शन यात्रेसाठी रविवार दि. २० रोजी शिरोली (सुलतानपूर), निमगाव सावा, औरंगपूर, पारगांव, कावळपिंपरी, मंगरूळ, झापवाडी,

रानमळा, साकोरी, राजुरी, उंचखडक, पिंपळझाप या गावांमधील महिला भगिनींसाठी बसेस बेल्हे येथून रवाना झाल्या. या मोहटादेवी दर्शन यात्रेसाठी हजारो महिला सहभागी झाल्या.

या यात्रेस महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांनी दीड हजार रुपये प्रति महिना मिळत असल्याने शासनाचे आभार मानले तसेच अतुल बेनके यांच्या कामाचं कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे