मतदार यादीत नाव कसे नोंदवायचे? वाचा सविस्तर माहिती

1 min read

पुणे दि.१९:- मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला www.nvsp.in या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे National Voters Service Portalची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. तिथं login/register या पर्यायावर क्लिक करावं लागेल. मग Don’t have account. Register as a new user या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे. मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो Enter OTP या पर्यायासमोर टाकून Verify वर क्लिक करायचं आहे. पुढे तिथं दोन पर्याय तुम्हाला दिसतील. एक म्हणजे I have EPIC Number आणि दुसरा म्हणजे I don’t have EPIC Number.तिथे I don’t have EPIC Number या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नाव, आडनाव, ई-मेल आयडी, पासवर्ड टाकायचा आहे. पुन्हा एकदा पासवर्ड टाकून तो कन्फर्म करायचा आहे आणि मग Register या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला परत एकदा लॉग-इन करायचं आहे. Registration करताना टाकलेला मोबईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग-इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुढे एका नवीन पेजवरील पहिल्या fresh inclusion/ enrolment या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Citizenship मध्ये I reside in India या पर्यायावर टिक करायचं आहे, आणि मग राज्य निवडायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केलं की, तुमचं गाव किंवा शहर ज्या मतदारसंघात येतं त्याविषयीची माहिती भरायची आहे.इथं लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा पोस्टाचा पत्ता टाकायचा आहे. यानंतर राज्य, जिल्हा, घर क्रमांक, रस्त्याचं आणि गावाचं नाव, पोस्ट ऑफिस, पिन कोड ही माहिती टाकायची आहे. त्याखाली Date या पर्यायासमोर तुम्ही वर सांगितलेल्या पत्त्यावर तुम्ही किती वर्षांपासून राहत आहात, ती तारीख, महिना आणि वर्षं इथं तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्हाला एक address proof जोडायचा आहे. इथं तुम्ही बँक पासबुक किंवा रेशन कार्ड असा एक पर्याय सिलेक्ट करून त्याचा फोटो अपलोड करू शकता.त्यानंतर जन्मतारीख, गावाचं नाव, राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे.त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डाचा फोटो तुम्ही इथं अपलोड करू शकता. आता तुम्हाला इथं Age declaration form हा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून हा फॉर्म डाऊनलोड करून भरायचा आहे. इथं तुम्हाला तुमचं नाव, वडील किंवा पतीचं नाव आणि गावाचं नाव टाकायचं आहे. पुढे मतदारसंघाचं नाव टाकल्यानंतर सही करून ठिकाण आणि तारीख टाकायची आहे. या भरलेल्या फॉर्मचा फोटो काढून तो Age declaration या पर्यायासमोर अपलोड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता वैयक्तिक माहिती भरायची आहे. इथं नाव आणि आडनाव टाकून लिंग निवडायचं आहे. त्यानंतर वडील, आई किंवा पतीविषयी माहिती द्यायची आहे. सुरुवातील तुमचं त्यांच्यासोबत काय नातं आहे ते निवडायचं आहे आणि मग त्यांचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. मग शेवटी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करून नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अपंगत्व असेल तर त्याची माहिती द्यायची आहे. सगळ्यात शेवटी दुसऱ्या एखाद्या मतदारसंघात नाव समाविष्ट करण्यासाठी मी अर्ज केलेला नाही तसंच माझं नाव कोणत्याच मतदारसंघाच्या यादीत नाहीये, या आशयाच्या declaration वर ठिकाण आणि तारीख टाकून नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.त्यानंतर मग preview या पर्यायाअंतर्गत नवीन मतदान कार्डासाठी तुम्ही आता भरलेला फॉर्म-6 तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्याखालील सबमिट या बटनावर क्लिक केलं की तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला एक रेफरन्स आयडी दिला जाईल. हा आयडी वापरून तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता.या वेबसाईटच्या होमपेजवर परत आलात की तुम्हाला तिथं Track application Status हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की, रेफरन्स आयडी टाकून Track status या पर्यायावर क्लिक करायचं आहे. एकदा का फॉर्म सबमिट झाला की त्याची स्थानिक Booth level officer छाननी करतात. त्यानंतर तो Electoral Registration officer (उपजिल्हाधिकारी) यांच्याकडे पाठवला जातो.)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे