लाडकी बहीणच्या जाहिरातबाजीवर सरकारचा २०० कोटींचा खर्च
1 min readमुंबई, दि.१९ – काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली,
शेतक-यांचे कर्जमाफ केले त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही. परंतु लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर महायुती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा अशा पद्धतीने इव्हेंट, जाहिरातीबाजी आणि
चमकोगिरीवर उधळून लूट सुरू आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.अतुल लोंढे म्हणाले, भाजप सरकारने प्रचंड महागाई करून ठेवली आहे. ७० रुपयांचे तेल १२० रुपये केले. साखर, गूळ, डाळी, रवा अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. नोकऱ्या नाहीत त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत नाही अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजनेची जाहिरातबाजी करून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना काय दाखवायचे आहे? यांनी घरातून पैसे दिले की प्रॉपर्टी विकून पैसे दिले? ते जनतेचे पैसे आहेत. जनतेच्या कराच्या पैशांची अशा पद्धतीने उधळपट्टी केली जात असल्याने सामान्य माणसाला चिड आल्याशिवाय राहणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.