राज्यात एकाच टप्प्यात होणार निवडणूक;पैसे, ड्रग्स, दारूचे वाटप यांवर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष; सर्वत्र चेकपोस्ट २४ तास होणार चेकींग

1 min read

मुंबई दि.१५:- महाराष्ट्राची निवडणूक राज्यात एकाच टप्प्यात होणार असून मतदान 20 नोव्हेंबर तर निकाल 23 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. मात्र, यंदा हरियाणाच्या निवडणुका आधी जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, तर झारखंड विधानसभेची मुदत 4 जानेवारी 2025 पर्यंत आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज 15 ऑक्टोबर दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषदेत घेत तारखांच्या घोषणा केल्या आहे.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु– महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार– 22 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरता येणार– 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख– 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार– 4 नोव्होंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख– 20 नोव्होंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार– 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार.24 तास चेकींग होणार

मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, ड्रग्स वाटप करणे, दारूचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 24 तास चेकींग होणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर असणार आहेत.

गर्दी असल्यास खुर्ची देणार

मतदानासाठी रांगा असल्या तर त्या ठिकाणी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ मतदार किंवा महिलांना त्या ठिकाणी काही वेळ खुर्चीवर बसता येणार आहे. तसेच मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा ठेण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे