जुन्नर बाजार समिती उपसभापती पदी प्रीतम काळे यांची निवड

1 min read

जुन्नर दि.१५:- आळे (ता. जुन्नर) गावचे माजी सरपंच व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रीतम काळे यांची बाजार समितीच्या उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली.उपसभापती प्रकाश ताजणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी शुक्रवारी (दि.११) निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली. या वेळी उपसभापतिपदी प्रीतम काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर उपसभापती काळे म्हणाले की, सभापती व संचालक मंडळ यांच्या सहमतीने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील. असे निर्णय घेण्यात येणार असून, आळेफाटा उपबाजार येथील गायींच्या बाजारास जागा कमी पडत आहे. जागा खरेदी करून या बाजारासाठी अद्ययावत अशा सुविधा उपलब्ध करणार आहे. या निवडीनंतर आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे, सचिव रूपेश कवडे व मान्यवरांच्या उपस्थितीत काळे यांचा सत्कार करण्यात आला. संचालक निवृत्ती काळे, पांडुरंग गाडगे, नबाजी घाडगे, आरती वारुळे, विमल तळपे, जनार्दन मरभळ, प्रियंका शेळके, सारंग घोलप, धनेश संचेती, जितेंद्र कासार, गजानन घोडे आदी या वेळी उपस्थित होते. या निवडीनंतर प्रीतम काळे यांची आळेफाटा, आळे येथे मिरवणूक काढण्यात येऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे