बिबट सफारीसाठी सत्तर बिबटे लागतात बाराशे बिबटे आमच्या मातीमध्ये ठेवता येणार नाही:- माजी आमदार शरद सोनावणे
1 min readआळेफाटा दि.१४:- बिबट सफारीसाठी फक्त सत्तर बिबटे लागतात मात्र उरलेले बाराशे बिबटे आमच्या मातीमध्ये ठेवता येणार नाही अशी भूमिका जुन्नर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आज दि.१४ जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी लागणार असल्याचे आवाहन जुन्नर तालुक्यातील माजी आमदार शरद सोनावणे यांनी केले.
बिबट्यांची वाढती संख्या व बिबट्यांच्या हल्ल्यात होणारे मृत्यु यावर कायमस्वरूपी उपाय करण्यात यावा या मागणीसाठी सोनवणे यांचे पिंपरीपेंढार येथे आंदोलन सुरु आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी रविवारी दि .१३ संध्याकाळी आळेफाटा चौकात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह प्रसन्न डोके, देवराम लांडे, मोहीत ढमाले, भानुविलास गाढवे, पिंटु वाळुंज, अनिल रायकर, संतोष घोटणे, कैलास वाळुंज, प्रदिप देवकर आदीसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी वनविभागाचा निषेध व्यक्त केला.सोनावणे म्हणाले कि, बिबट्या हा विषय पक्षीय, राजकीय किंवा कुणाचा वैयक्तिक नाही. हे आंदोलन जुन्नर तालुक्याच्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आहे. ह्या आंदोलनाला शरद सोनवणेच नेतृत्व म्हणू नका अनेक कुटुंबाने भोगल आहे. मी मुख्यमंत्री यांच्या जवळ आहे, असे काही लोक म्हणतात. माझी माणसं माझ्याबरोबर चोवीस तास आहेत. त्या मातीतला मी माणूस आहे. आमची आई, आमची बहीण बिबट्याच्या हल्ल्यात गेली आहे. लक्षात ठेवा त्यांचा पातक मात्र तुमच्या डोक्यावर आहे, तुम्हाला आयुष्यात कधीच समाधान लाभणार नाही. तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही हे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवाव. जुन्नर तालुका बिबट्या मुक्त करण्यासाठी वन विभागाने तसा प्रस्ताव वरिष्ठ का पाठवला पाहिजे. मात्र अधिकारी हतबल झाल्यासारखे वागत आहे.