निमगाव सावात वनस्पती बाबा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
1 min read
निमगाव सावा दि.१३:- जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे वनस्पती बाबा नवरात्र उत्सव बागवाडी माथा येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने अनेक कार्यक्रम घेवुन साजरे केले. त्यामध्ये दररोज लकी ड्रॉ १ मानाची पैठणी सुवर्ण कलेक्शन, बाळासाहेब गाडगे, हभप खाडे महाराज, दता डुकरे फिटर, अष्टविनायक उद्योग समूह राजु पोळ,साई लक्ष्मी रवीशेठ आगळे, कारभारी गाडगे, राधास्वामी मशिनरी, नारायणशेठ मते यांच्या कडुन दररोज मानाची पैठणी देण्यात आली व दररोज वृद्ध महिलांना गणेश गाडगे यांच्या कडुन डिनर सेट भेट देण्यात आली.
व दि .११ रोजी खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला त्याचे निवेदन केतन गाडगे यांनी केले व मानाच्या भेट वस्तु व पैठणी देण्यांत आला. विजयी 3 महिलांना त्यामध्ये वैष्णवी गणेश गाडगे, स्वाती योगेश गाडगे, शुभांगी प्रविण गाडगे यांना देण्यात आली कार्यक्रमांचे डेकोरेशन जानकु गाडगे, डि. के. गाडगे यांनी केले कार्यक्रमांचे सुत्रसंचालन मंडळाचे संस्थापक नवनाथ गाडगे व गणेश गाडगे होमगार्ड यांनी केले.