जुन्नर तालुक्यातील बिबट्याच्या हल्यात महिला ठार

1 min read

पिंपरी पेंढार दि.९:- जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार हद्दीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना बुधवार दि.९ पहाटे च्या सुमारास घडली आहे.पिंपरी पेंढार येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुजाता रवींद्र डेरे (वय वर्ष ४०) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी पेंढार मधील ही दुसरी घटना व त्याच परिसरातील एक किलोमीटरच्या अंतरावर घडली असल्याची माहिती हाती आली आहे. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे तात्काळ दाखल झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे