जुन्नर बार असोसिएशन च्या वतीने आमदार अतुल बेनके यांचा सत्कार
1 min readजुन्नर दि.९:- जुन्नर येथे जिल्हा व सत्र न्यायालय प्रस्तावाबाबत शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर या प्रस्तावास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने अंतिम मंजुरी देण्यात आली. या निर्णयासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल जुन्नर तालुका बार असोसिएशन च्यावतीने तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यासाठी पाठपुरावा करण्यासाठी जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन ने देखील प्रयत्न केले त्याबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
या प्रसंगी बार कौन्सिल जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत भास्कर, उपाध्यक्ष ॲड. समीर पुरवंत, उपाध्यक्ष ॲड. हेमंत हाडवळे, सेक्रेटरी ॲड. आशिष वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.