जुन्नरची जागा ठाकरे गटालाच मिळावी; अन्यथा शिवसैनिक ठरवतील तो उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्याची तयारी

1 min read

नारायणगाव दि.९:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जागावाटपात जुन्नरची जागा ठाकरे गटालाच मिळावी यासाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी नारायणगाव येथे पत्रकार परिषद घेतली.

मशाल या चिन्हावर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे देतील तो उमेदवार आम्हाला मान्य असेल असे मत उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केले. जागावाटपात काही दगाफटका होऊन शिवसेनेला तिकीट मिळाले नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावर शिवसैनिक ठरवतील तो उमेदवार उभा करून. त्याला निवडून आणण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यानिमित्ताने ठणकावून सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुका समन्वयक बाबा परदेशी, मा जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्कर गाडगे, उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, उपतालुका प्रमुख बन्सी चतूर, उपतालुका प्रमुख उत्तम काशीद, उपतालुका प्रमुख मोहन बांगर, उपतालुका प्रमुख चंद्रकांत डोके, उपतालुका प्रमुख सुनील पवार, उपतालुका प्रमुख राहुल सुकाळे, तालुका युवा अधिकारी शांताराम सावंत, विभाग प्रमुख खंडू शिंदे, विभाग प्रमुख अजित सहाणे, उपविभाग प्रमुख रामदास नायकोडी, शहरप्रमुख समीर भगत यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे