ठिकेकरवाडीला १ कोटी ६१ लाखांचा निधी; आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते भूमिपूजन

1 min read

ठीकेकरवाडी दि.९:- आदर्श गाव ठिकेकरवाडी येथे १ कोटी ६१ रू. विकास निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये पुढील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

ठिकेकरवाडी येथील मारुती मंदिर येथे सभामंडप बांधणे ठिकेकरवाडी येथील शादिखाना सुशोभीकरण करणे -१० लक्ष ठिकेकरवाडी पिंपळशेत रस्ता करणे – ४ लक्ष


ठिकेकरवाडी मुस्लीम वस्ती रस्ता कॉक्रीट करणे – ७ लक्ष
ठिकेकरवाडी येथे ग्रामसचिवालय बांधणे – २० लक्ष
नागझीरे रोड ते ठिकेकरवाडी रस्ता करणे – १० लक्षठिकेकरवाडी ते ओतूर रस्ता करणे – ५० लक्ष
ठिकेकरवाडी येथील मुस्लिमवस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष ठिकेकरवाडी येथील मळगंगामाता साभाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष
ठिकेकरवाडी येथील पिंपलशेत रस्ता करणे – १० लक्ष
ठिकेकरवाडी येथील पत्र्याची विहीर ते ठिकेकरवाडी रस्ता करणे – १० लक्षठिकेकरवाडी येथील स्मशानभूमी सुधारणा करणे – १० लक्ष ठिकेकरवाडी हे गाव विविध सामाजिक आणि लोकं उपयोगी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी आल्यावर ग्रामस्थ नेहमीच प्रेम आणि आपुलकीने स्वागत करतात. गावच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य याआधीही करत आलो यापुढेही असेच सहकार्य कायम करत राहू असा विश्वास याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना दिला.

यावेळी संतोष ठीकेकर, विशाल तांबे, गोविंद बोरचटे यांसह गावचे सरपंच, उपसरपंच, इतर मान्यवर, महिला, युवक, युवती आणि जेष्ठ मंडळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे