जुन्नर नगरपरिषदसाठी नगरोत्थान योजने अंतर्गत ७ कामांना ३ कोटी २ लक्ष रुपये मंजूर

1 min read

जुन्नर दि.१०:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने व आमदार अतुल बेनके यांच्या विशेष प्रयत्नातून जुन्नर नगरपरिषदसाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत ७ कामांना ३ कोटी २ लक्ष ८५ हजार रुपये मंजूर झाले आहेत.या मद्ये खालील कामांचा समावेश आहे.

१) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील कदम वाईन्स ते जगमाथा चौक रस्ता खोदाई करून रस्ता कॉक्रीटीकरण करणे – ४९ लक्ष रुपये २) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील कल्याण पेठ विलास जयवंत बुट्टे घर ते मुंडे हायस्कूल पर्यंत पाईप गटर करणे – ११ लक्ष रुपये ३) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील जागमाथा कृष्णा फोटो स्टुडीओ ते जागमाथा गणपती मंडळापर्यंत रस्ता खोदाई करून रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे – ४० लक्ष रुपये.४) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील राजू लुणावत पर ते बाळासाहेब कर्पे गुरव आळी खोदाई करून सिमेंट कॉक्रीटीकरण रस्ता करणे – ३० लक्ष रुपये ५) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील विलास वर्षे यांच्या घराशेजारील बोळीत खोदाई करून सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता करणे -९ लक्ष रुपये ६) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील सि.स.न. ५१२६ मधिल रोकडे मारुती मंदिराजवळील जागेत बहुउद्देशीय सभागृह बांधणे – १ कोटी २९ लक्ष रुपये ७) जुन्नर नगरपरिषदेचे हद्दीतील खालचा माळीवाडा येथील सि.स. नं. ३३४९ या जागेत सरंक्षक भिंत बांधणे व गार्डन आणि ओपन जिम करणे – ३५ लक्ष रुपये

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे