नारायणगावच्या शाश्वत विकासासाठी १५० कोटी ची विकासकामे मंजूर – आमदार अतुल बेनके
1 min read
नारायणगाव दि.८:- नारायणगाव शहर आणि परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस नारायणगाव शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत (सोमवार दि.७) रोजी संपन्न झाले.
नारायणगाव आणि परिसर विकासासाठी तब्बल १५० कोटी रू. निधी विविध विकासकामांसाठी शासनाच्या माध्यमातून मंजूर करून आणला आहे.
यातील काही कामे प्रगती पथावर आहेत तर काही पूर्ण झालेली आहेत अशी माहिती आ. अतुल बेनके यांनी माध्यमांशी बोलताना दिली.यावेळी बोलताना आ.अतुल बेनके म्हणाले, नारायणगावचे ग्राम दैवत श्री आई मुक्ताबाई मातेचा आशिर्वाद हा बेनके परिवाराला देखील मिळाला आहे या आशिर्वादाच्या जोरावरच मला जनतेची काम करण्याची ऊर्जा मिळते.
स्व. वल्लभ बेनके साहेबांनी मुक्ताबाई देवस्थान ट्रस्ट ला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून दिला. नारायणगाव परिसरात विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर नारायणगाव गाव अंतर्गत रस्ता, एसटी स्टँड ते खोडद ( गाव अंतर्गत रस्ता), नारायणगाव येथील अष्टविनायक महामार्ग कोल्हे मळा रस्ता यासाठी २५ कोटी रू मंजूर झाले आहेत.
तसेच नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण कामासाठी ९० कोटी रू. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे लवकरच हे काम सुरू होईल. याबरोबर कोल्हे मळा येथील सावता महाराज मंदिराच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.
गावातील इतर रस्ते, सभागृहे बांधणे अशा विविध कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. गावासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून विकासाची भूमिका घेऊन प्रत्येकाने काम केलं पाहिजे असे प्रतिपादन आ. बेनके यांनी यावेळी केले.
जुन्नर तालुका पर्यटन विकास आराखडा अंतर्गत गावचा अभिमान असलेल्या तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाचे काम आणि त्यांच्या नावाने एक नाट्यगृह आम्ही उभारणार आहोत. त्याचबरोबर मीना डावा कालव्यावर एक कोटी रू.निधीतून नवीन साकव पुल उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.
असे आ. बेनके यांनी यावेळी सांगितले. या गावच्या विकासासाठी यापुढेही कायम कटिबद्ध राहू असा विश्वास आ. बेनके यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला. यावेळी खालील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.
०१) नारायणगाव येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय बांधणे. – ९० कोटी०३) नारायणगाव खोडद रोड रस्ता काँक्रिटीकरण/ डांबरीकरण करणे. – १४ कोटी०२) नारायणगाव येथील अष्टविनायक महामार्ग (ओझर रोड, कोल्हे मळा औटी मळा) २५ कोटी ०४) नारायणगाव जुन्नर रोड रस्ता काँक्रिटीकरण करणे. – ६ कोटी रू.०५) नारायणगाव येथील वालझाडे मळा येथे साकव व विमोचक बांधणे. – २ कोटी १९ लक्ष रू. ०६) नारायणगाव येथील मिना डावा कालवा साकव बांधणे. – १ कोटी०७) नारायणगाव ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लॅट बसविणे. – ४१ लक्ष ०८) नारायणगाव येथे मुस्लिम समाज शादीखाना बांधणे. – ३० लक्ष
०९) नारायणगाव येथील अनुज गोल्डन सिटी अंतर्गत रस्ता. – २० लक्ष १०) नारायणगाव ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजन प्लँट शेड. – २० लक्ष ११) नारायणगाव येथील जुना पारगाव रस्ता काँक्रीटीकरण करणे. – २० लक्ष १२) नारायणगाव कोल्हे मळा संत सावता महाराज मंदिर संरक्षण बांधणे. – २० लक्ष
१३) नारायणगाव येथील वैद वस्ती येथील सामाजिक सभागृह बांधणे. -२० लक्ष१४) नारायणगाव येथील श्रीराम ग्रीन्स सोसा. ते रोझ पेटल्स सोसा. रस्ता करणे. – २० लक्ष१५) नारायणगाव वॉर्ड क्र.५ रस्ता सुधारणा करणे. – १५ लक्ष१६) नारायणगाव नारायणवाडी पाण्याची टाकी ते मुलनशेत रस्ता करणे. – १० लक्ष
१७) नारायणगाव मीना कॅनॉल ते एकनाथ शेटे घर रस्ता करणे. – १० लक्ष १८) नारायणगाव मीना कॅनॉल ते गोकुळ वाजगे घर रस्ता करणे. – १० लक्ष १९ ) नारायणगाव येथील खडकवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे. – १० लक्ष २०) नारायणगाव येथील मुक्ताई ढाबा ते शिवतेज फार्मर कंपनी रस्ता करणे. – १० लक्ष
२१) नारायणगाव येथील पाटे खैरे मळा येथील रस्ता करणे. – १० लक्ष२२) नारायणगाव बागलोहरे गावठाण मारुती मंदिर समोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे.- १० लक्ष
२३) नारायणगाव येथील नारायणवाडी येथे रस्ता डांबरीकरण करणे. – १० लक्ष२४) नारायणगाव येथील बागलोहरे गावठाण येथील सभागृह सुधारणा करणे. – १० लक्ष२५) नारायणगाव येथील खडकवाडी ओढ्या शेजारील रस्ता खडीकरण करणे, – १० लक्ष२६) नारायणगाव जय अंबे रेसिडेन्सी म्हसोबा देवस्थान रस्ता करणे. – १० लक्ष
२७) नारायणगाव येथील तारांगण सोसायटी रस्ता करणे. – १० लक्ष२८) नारायणगाव येथील मुक्ताई ढाबा येथे १०० केव्ही रोहित्र बसविणे. – ८ लक्ष२९) नारायणगाव येथील पाटे खैरे मळा येथे १०० केव्ही रोहित्र बसविणे. – ८ लक्ष
प्रस्तावित काम : नारायणगाव येथील मुस्लिम समाज दफनभुमी संरक्षण भिंत बांधणे. २० लक्ष
या कार्यक्रम प्रसंगी अमितशेठ बेनके, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजितभाऊ खैरे, जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष गणेश वाजगे, एकनाथ मामा शेटे, ग्रा.पं.सदस्य जुबेरभाई अत्तार, रामदास अभंग, अशोक पाटे, शहर अध्यक्ष रोहिदास केदारी, ऋषी वाजगे, सागर दरंदाळे, सोपानमामा खैरे, राजेंद्र कोल्हे, शशिकांत वाजगे, हितेश कोऱ्हाळे, प्रवीण पाटे, यल्लूशेठ लोखंडे, तुषार पडवळ, नितीन शेंडे, वैजयंती कोऱ्हाळे, दिपालीताई खैरे, अनिता नाईक यांसह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.