बेल्ह्यात शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
1 min read
बेल्हे दि.८:- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी उपबाजार बेल्हे या ठिकाणी शासकिय सोयाबिन खरेदी केंद्र सुरू करन्यात यावे अशी पुर्व भागातील व पठार भागातील शेतकऱ्यांची मागनी केली आहे.,
आणे पठार भाग, आळे, राजुरी, बेल्हे, साकोरी, मंगरूळ, पारगाव, निमगाव सावा, बोरी, साळवाडी, तसेच इतर गावांतील शेतकऱ्यांना फायदा होईल. बारामती बाजार समितीनी केंद्र सुरू केले आहे.
तरी जुन्नर बाजार समिती ने सुध्दा केंद्र सुरू करावे अशी मागणी बेल्हे येथील शिवाजी डुंबरे, आणे येथील आणे गावच्या सरपंच प्रियांका प्रशांत दाते, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर व या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.