बोरीच्या महिला शेतकऱ्यांकडून अमेरिका पालेभाजी

1 min read

बोरी दि.१४:-बोरी बुद्रूक येथील वंदना संतोष गुंजाळ या महिला शेतक-याने झुकिनी या जातीच्या अमेरीकन पालेभाजी ची लागवड केली असून यामधून त्यांचा चांगल्या प्रकारचा नफा मिळणार आहे.बोरी बुद्रूक या ठिकाणाहुन कुकडी प्रकल्पातील कालवा तसेच कुकडी नदी गेल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम झाला असुन याच पाण्याच्या जोरावर येथील शेतकरी नवनविन प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग महिला शेतकरी असलेल्या वंदना संतोष गुंजाळ यांनी केला असुन स्वता बी.ए.पर्यत शिक्षण घेतले असुन पतीच्या निधनानंतर न डगमगता घरची असलेली जवळपास पंधरा एकर जमीन ते स्वतःला करत आहेत व या शेतीमध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊन उत्तम प्रकारे शेती आहेत. व यासाठी नेहमी ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरत असतात त्या ठिकाणी भेट देत असतात असाच पुणे या ठिकाणी भरलेल्या कृषी प्रदर्शनात झुकिनी या अमेरीकन पालेभाजी ची माहीती घेऊन याची शेती कश्या पध्दतीने केली जाते याचा अभ्यास केला. व यांचे लागवड करण्याचे ठरवले.जाधव यांणी यासाठी २० गुंठे क्षेत्राची यासाठी निवड केली व यामध्ये सुरवातीला पाच ब फुटांच्या अंतरावर बेड पाडुन या बेडवर शेणखत टाकुन ट्रॅक्टर द्वारे मल्चिंग पेपर टाकुन घेतल्यावर तीन फुटांच्या अंतरावर आळेफाटा या ठिकाणाहून झुकनी या जातीची १५०० बिया (३०पुड्या एका पुडीत ५० बिया) ३० ऑगस्ट रोजी आणुन लावल्या.या पिकाला वेळोवेळी जैविक औषधी फवारणी केल्यानंतर साधारणपणे ४० दिवसानंतर या झाडाला फळे आल्यानंतर पहिल्या तोडयात १६३ नग (३० किलो) माल निघाला असुन २०० ग्रॅम वजनाचे एका नगाचे कमीत कमी १५ रुपये किंमतीने विक्री होत आहे व अंदाजे ३ टन माल निघणार आहे. व यासाठी खर्च २५ ते ३० हजार रुपये खर्च आला असुन यामध्ये झालेला खर्च जाता नव्वद ते लाख रुपये पर्यंतचा नफा मिळणार आहे. विशेष म्हणजे हे पिक कोणत्याही महिण्यात घेतले तरी ते चांगले येते. तसेच या पालेभाजीस शहरांमध्ये चांगली बाजारपेठ उपलब्ध असुन हे पीक घेणारी पुणे जिल्ह्यातील पहिला प्रयोग गुंजाळ यांनी केला आहे.

प्रतिक्रिया – वंदना गुंजाळ

‘झुकिनी या परदेशी भाजीचे उगमस्थान अमेरिका असुन झुकिनी हे इटालियन नाव आहे. इटलीतून या भाजीचा प्रसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मेक्‍सिको, फ्रान्स, तुर्कस्थान, ब्राझील, चीन, जर्मनी आणि भारत आदी देशांत घेतले जात असुन ही झाडे बुटकी, झुडूप वजा असतात. काकडीसारखेच आकाराने दिसणारे या पिकाचे फळ गर्द हिरवे, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येते. झुकिनी या भाजीत भरपूर प्रमाणात पोषक द्रव्ये (जीवनसत्त्वे, खनिजे, तंतूमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ) उपलब्ध असतात. फळाच्या सालीत तंतूमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते. हृदयाचे ठोके नियंत्रित करणे तसेच पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी झुकिनी फळ महत्त्वाचे आहे. तसेच हे पिक घेण्यासाठी सासुबाई मिनाक्षी गणपत गुंजाळ व मुलगा ओंकार यांची मोलाची साथ मिळत आहे.”

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे