विलास वाव्हळ यांच्या उमेदवारीसाठी समर्थकांची ओझर येथे बैठक; समर्थक संजय राऊत यांची घेणार भेट
1 min read
ओझर दि.६:- जुन्नर विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार विलास वाव्हळ यांच्या जुन्नर तालुक्यातील समर्थकांची शनिवार दि.५ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र ओझर अष्ट विनायक जुन्नर येथे बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत जुन्नर ची जागा शरद पवार गटाने विलास वाव्हळ शिवसेना उबाठा गटाचे पक्ष संघटक तथा पक्ष कार्यकारणी सदस्य यांच्या साठी सोडावी या करीता दि.९ ऑक्टोबर रोजी सर्व कार्यकर्ते शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना भेटून तशी विनंती करणार आहे.
सदरची शीट हि इतर मागास वर्गीय समाज्यास सोडून प्रथमच जुन्नर चे प्रतिनिधित्व इतर मागास वर्गीय समाज्याच्या नेत्यास करण्याचे भाग्य मिळावे अशी हि भावना व्यक्त करण्यात आली. सदर बैठकीत कामगार नेते व महाराष्ट्र गुणवंत कामगार पुरस्कार विजेते दिलीप खोंड यांनी काही झाले तरी विलास वाव्हळ यांनी जुन्नर विधानसभा लढवावी असे मत व्यक्त केले.