विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चालू हंगामाचे उसाचे गाळप वेळेत चालू करा:- शेतकरी संघटना
1 min read
जुन्नर दि.५:- सन २०२३/२०२४ ला गाळपास आलेल्या ऊसाला अंतिमबाजार ३५०० रुपये द्यावा तसेच श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चालू हंगामाचे उसाचे गाळप वेळेत चालू करण्यात यावे आशी मागणी जुन्नर तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. अन्यथा राज्य शासनाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
शेतकरी संघटनांच्या मागण्या १) सन २०२३/२०२४ ला गाळपास आलेल्या ऊसाला अंतिम बाजार ३५०० रुपये मिळावा२) हुमणीचा प्रादुर्भाव चालू वर्षी मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्यामुळे कारखान्यामार्फत उपाययोजना करण्यात याव्यात. ३) वेलवर्गीय तन ऊस ऊस शेतीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या मागण्या आहेत.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, सन२०२३/२०२४ ला गाळपास आलेल्या ऊसाला अंतिम बाजार भाव ३५०० रुपये द्यावा सभासदांची ऊस उत्पादकांची दिवाळी गोड करावी.मंत्रिसमितीने साखर कारखाने १ महिना उशिराने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. हजारो ऊस उत्पादक शेतकरी म्हणत आहेत. की आमच्या ऊसाला ऊणीचा प्रादुर्भाव झाला आहे. ऊस पडुन झडुन अपरिचित नुकसान होणार आहे. अख्या महाराष्ट्रात लाखो टन ऊसाचे नुकसान होणार आहे. सगळी बंधने शेतकर्यांनाच का? तसा सरकारने साखर निर्यात बंदी घालुन शेतकरी बुडविलाच आहे. सरकार असे का करते ?
ऊस शेतीमध्ये वेलवर्गीय तन मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे ते तन 2/4/D (AMINE SALT)
शिवाय जात नाही व हे तणनाशक द्राक्ष वेल वर्गीय पिकांसाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व फळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होत आहे त्यावर देखील कारखान्याने काय उपाय योजना करता. येतील यासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावे अशी माहिती प्रमोद खांडगे पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना यांनी दिली.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांना रमेश शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सह्याद्री शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य डॉ.गणपत डुंबरे राष्ट्रीय अध्यक्ष जयशिवराय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,
योगेशभाऊ तोडकर मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष पुणे, गणेश गडगे तालुकाध्यक्ष जुन्नर सह्याद्री शेतकरी संघटना, प्रकाश बनकर, सचिन थोरवे तालुकाध्यक्ष जुन्नर युवक आघाडी शेतकरी संघटना, मनोजभाऊ शिंदे उपाध्यक्ष जुन्नर युवक आघाडी शेतकरी संघटना, लीना गडगे महिला शेतकरी संघटना प्रतिनिधी शेतकरी दत्तात्रय बनकर यांनी निवेदन दिले.