विश्वासराव मळा प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी महेश विश्वासराव यांची निवड

1 min read

साकोरी दि.३:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विश्वासराव मळा (साकोरी, ता.जुन्नर) शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी महेश बाळभाऊ विश्वासराव यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रवीण पंढरीनाथ विश्वासराव यांनी आदर्शवत काम करत नवीन सदस्यांना अध्यक्षपदाची संधी दिली. उपाध्यक्षपदी प्रियंका विश्वासराव यांची निवड करण्यात आली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष महेश विश्वासराव यांनी शाळेच्या विकास कामासाठी कटिबद्ध राहून शालेय व्यवस्थापन समितीकडून शाळेला सहकार्य करणार असल्याचे सदस्य पदी शिल्पा अजय साळवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला. साकोरी गावचे ग्रामपंचायत सदस्य राहुल विश्वासराव यांनी मनोगत व्यक्त करीत अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सदस्य सचिन बनकर, महादेव मोरे इत्यादी सदस्य उपस्थित होते. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक सोपान बेलकर (केंद्रप्रमुख बेल्हे) उपशिक्षिका संध्या भूमकर यांजकडून नवनिर्वाचित अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे