दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

1 min read

निमगाव सावा दि.३:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्तिक जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी खेड्यांचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. हा विकास साधायचा असेल तर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची आज देशाला खऱ्या अर्थाने गरज असल्याचे सांगितले. महात्मा गांधी म्हणाले होते. खेड्याकडे चला खरा भारत खेड्यामध्ये आहे. खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होण्यास हातभार लागेल. आपल्या कृषीप्रधान देशाचा आत्मा हा खेड्यांचा विकास आहे आणि त्यासाठी खेडे विकसित होणे गरजेचे आहे. तर लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन. या देशाचा विकास साधायचा असेल तर शेतकरी आणि जवान हे दोन आधारस्तंभ गरजेचे असल्याचे सांगितले. कृषीप्रधान देशाचा आत्मा शेती आणि शेतकरी आहे. आणि त्यातूनच खेड्यांचा विकास शक्य आहे हा दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा समानतेचा धागा यावेळेस त्यांनी उघडून सांगितला.संस्थेचे अध्यक्ष मा. संदिपान पवार यांनी देखील यावेळी उपस्थितांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुभाष घोडे व कार्यालय अधीक्षक मा. गोविंद गाडगे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मा. शांताराम गाडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पूजा सुखदेव थिगळे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे